Monday 22 August 2022

बचतगट (SHG ) संकल्पना, व्याप्ती आणि आणि इतिहास. (महिला सक्षमीकरण )

 

स्वयंसहायता गट म्हणजेच बचत गट त्यालाच (धग ) म्हणले जाते. १० ते २० महिला एकत्र येऊन एक गट स्थापन करतात आणि त्या मार्फत एकमेकांच्या गरज भागविल्या जातात. आज हि चळवळ देशातली सर्वात मोठी चळवळ तसेच महिलांचा विकास घडवणारी सर्वात मोठी चळवळ आहे. या मूळे मायक्रो फायनान्स च्या माध्यमामुळे कर्जाच्या पाशातूत सुटका व्हायला मदत झाली, देशाला या मायक्रो फायनान्स सिस्टीम मूळे आर्थिक चालना मिळाली, अनेक महिला उद्योजक झाल्या, सावकारी पाशातून सुटका झाली तसेच महिलांचे आर्थिक सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये योगदान वाढले. असे असतानाही बचतगट म्हणजे काय, त्याचा इतिहास आणि मूळ संकल्पना आणि महत्व माहित नसल्याने बरेच गैरसमज निर्माण होतात त्यासाठी हि माहिती. 

  •  स्वयंसहायता चळवळीचा इतिहास : 

मागास राष्ट्र म्हणूनगंल्या गेलेल्या बंगला देशात सर्वात प्रथम स्वयंसहायता बचत गटाच्या संकल्पनेची सुरवात झाल्याचे दिसून येते. नोबेल पारितोषिक विजेते डॉ. मोहम्मद युनूस यांनी बांगला देशात स्वयंसहायता बचतगटाची मुहूर्तमेढ रोवली. डॉ मोहम्म्द युनूस हे चितगाव विद्यापीठामध्ये अर्थशास्र्र विषयाचे अध्यापक होते.बांगलादेशमध्ये १९७४ मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या आपत्ती मुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली होती विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या जोबारा गावात जगण्यासाठी महिला धडपडत होत्या, सावकारी पाशात अडकलेल्या लोकांना कसलाही आधार नव्हता हे सर्व डॉ मोहम्मद युनूस यांनी पहिले त्या वेळी डॉ मोहम्मद युनूस यांनी स्वतःला नोबेल पारितोषात मिळालेली रक्कम प्रायोगिक तत्वावर कर्ज स्वरूपात दिली या गरजवंत लोकांनी आपली गरज पूर्ण झाल्या नंतर हि परत केली तेव्हा डॉ मोहम्मद युनूस याना लक्षात आले जर याना गरजवंतांना कर्ज स्वरूपात रक्कम दिली तर हे लोक वेळेत आपली रक्कम परतफेड करतात त्यावेळी त्यांनी गट तयार केले आणि स्वतःची काही रक्कम बचत म्हणून साठवण्यास सुरवात करण्यात आली हीच रक्कम गरज पडल्यावर गरजवंताला कर्ज स्वरूपात देण्यात येऊ लागली यामुळे सावकारी पेश्याला आळा बसू लागला आणि आर्थिक परिस्थिती हि सुधारू लागली त्यांनी जोबार गावात या योजनेची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर १९८३ मधे ग्रामीण बँकेची स्थापना करण्याचा कायदा करण्यात आला डॉ मोहम्मद युनूस यांनी जगाला दाखवून दिले गरजवंताला विना तरल दिलेले कर्ज वेळेत परतफेड होते. भारत मधे १९८५ मधे मायराड (Mysore Resettlement and Development Agencies - MYRADA) या संस्थेने बचतगट चळवळीची सुरवात केली या गटाचे प्रणेते डॉ मोहम्मद युनूस यांनी भारताच्या निमंत्रण वरून  १९९० साली नेहरू विद्यापीठात स्वयंसहायता बचतगट चळवळी विषयी मार्गदर्शन केले. १९९२ मधे आशिया पॅसिफिक रूरल आणि क्रेडिट असोसिएशन च्या साहाय्याने हे गट राबविण्यास सुरवात झाली आणि १९९३ मधे रिझर्व्ह बँकेने याला कायदेशीर मान्यता दिली. या चळवळी मधे महिलांचा सहभाग लक्षणीय वाढला भारतामध्ये विविध राज्यामध्ये हि चळवळ फोफावत गेली. 
 

महाराष्ट्र मधील सुरवात :

इतर राज्य प्रमाणेच महाराष्ट्रातही या चळवळीने चांगलीच गती घेतली, महाराष्ट्र राज्य पुरोगामी विचारांचे राज्य म्हणून भारतामध्ये ओळखले जाते. मा शरद पवार यांनी महिला धोरण ची आखणी करून स्वयंसहायता गाताना प्राधान्य देण्यात आले त्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात या चळवळीने वेग धरला. महाराष्ट्रात स्वयंसहायता गटाची पार्श्वभूमी तशी जुनीच आहे १९७० पसुन्याची तयारी सुरु झाल्याचे दिसून येते ,इलाबेन भट यांनी १९७७ मधे महिला व सूक्ष्म वित्त पुरवठा याची मांडणी केली होती. १९८८- ८५ मधे गडचिरोली येथे गट सुरु झाल्याचे दिसून येते. १९९३ मध्ये ग्रामीण वित्त पुरवठा अंतर्गत चालना देण्यात आली. महाराष्ट्रात १९९४ मधे महिला धोरण आल्या नंतर केंद्र सरकार व आंतराराष्ट्रीय कृषी विकास निधी च्या साहाय्याने महाराष्ट्र ग्रामीण पत पुरवठा प्रकल्प सुरवातीला चार जिल्ह्यात राबविण्यात आला याची जबाबदारी महिला आर्थिक विकास मंडळ वर सोपीविण्यात आली तसेच या कार्यक्रमात महिला मंडळ, महिला व बाल ग्रामीण विकास महामंडळ, स्वयंसेवी संस्था यांनी मोलाचा सहभाग नोंदवला त्याच प्रमाणे १९९६ साली स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार अंतर्गत दारिद्र्य निर्मूलनासाठी ग्रामीण भागात अनुदान तत्वावर जोमाने सुरु झाले त्या नंतर बचत गट चळवळीने एक व्यापक स्वरूप घेतले आणि प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्यक्ष गावात बचत मोठ्या प्रमाणात स्थापन झाले.

 

स्वयंसहायता गटांचे उद्देश : 

स्वयंसहायता या शब्दातच याचा उद्देश सांगितलेला आहे, या चळवळीची सुरवात करत असताना याचे निकष आणि उद्देश त्या वेळच्या परिस्थिती नुसार ठरविण्यात आला होता जो आता बदलत चालाल आहे आणि बदलला हि पाहिजे.
१. गरीब, दारिद्रयरेषेखालील, वांछील घटकातील लोकांची पिळवणूक थांबावी, सावकारी पाशातून सुटका व्हावी तसेच ताट मानेने जगात यावे या उद्देशाने सुरवात करण्यात आली.
२. दैनंदिन स्वरूपात काही बचत करून, एक च्या जागी समूहाने बचत करून एकमेकांच्या अडीअडचणीच्या वेळी एकत्रित बचतीतून कर्ज स्वरूपात मदत करून आपणच आपल्या अडचणी सोडवाव्या हीच या स्वयंसहायता गटाची मूळ संकल्पना.
३. महिलांचे एकत्रित येण्याने तसेच व्यवहार केल्याने सामाजिक, आर्थिक, वैचारिक, मानसिक परिवर्तन घडवून आणणे त्यांना स्वबळावर उभे करणे हा हि एक या मागचा उद्देश आहे.
४. १० ते २० महिला एकत्रित येऊन बचत करून त्यातून जोड उद्योग उभा करणे, स्वरोजगाराच्या संधी उभ्या करणे हा उद्देश समोर येतो.

 

स्वयंसहायता गटांची व्याप्ती : 

स्वयंसहायता गट म्हणजे SHG हि संकल्पना फक्त बांगलादेश किंवा भारतातच नाही तर अनेक विकसनशील देशांनी या संकल्पनेचा स्वकार केला देशाती आर्थिक विकासातील महिलांचे योगदान वाढविण्यासाठी तसेच महिलांचे मायक्रो फायनान्स च्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालील किंवा वंचित लोकांना प्रवाहात आणण्यासाठी तसेच आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ह्या संकल्पनेचा उपयोग करण्यात येत आहे. बांगलादेश, तिवान, अफगाणिस्थान ,पाकिस्थान, नेपाळ, इंडोनेशिया अश्या ५० पेक्षा जास्त देशांमध्ये या संकल्पनेद्वारे महिलांचा तसेच देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत.
फक्त विकसनशील देशातच नाही तर विकसित देश जसे रशिया, जर्मनी, युनायटेड नेशन मधे अनेक देशांनी या संकल्पनेचं स्वीकार केला परंतु प्रत्येक देशात हि संकल्पना वेगवेगळ्या उद्देशाने वापरली जाते विकसित देशामध्ये या संकप्लनेच वापर करून उद्योग व्यवसाय वाढविणे, समाजातील दुर्लक्षित घटक किंवा विषय याना हेल्प म्हणून समूहात रित्या मदत किंवा मायक्रो फायनान्स च्या माध्यमातून मदत म्हणून वेगवेगळ्या संघटना तयार झाल्या आहेत ज्याला तेथील सरकार च्या माध्यमातून राबविले जाते. 
जर्मनी, अमेरिका सारख्या देशात shg हि संकल्पना मेडिकल क्षेत्रात, पेशंटस ची मदत, विकलांग व्यक्ती, मतिमंद अश्या पेशंटच्या मदतीसाठी तयार करण्यात अली आहे यासाठी मोठ्या प्रमाणात निधी सरकार कडून दिला जातो.

 

बचतगट संकल्पना आणि भारतीय अर्थव्यवस्था :

भारतीय अर्थव्यवस्थेत बचतगट ची चळवळ हि सर्वात मोठी चळवळ समजली जाते. भारतीय अर्थव्यवस्थेत महिलांचे योगदान वाढविण्यासाठी या चळवळीचे खूप मोठे योगदान आहे. देशात स्वयंसहायता गटांची चळवळ अतिशय वेगाने वाढत आहे आणि बचत गटामध्ये लक्षणीय वाढ होत आहे. ग्रामीण आणि शहरी भागात बचतगट मोट्या प्रमाणात स्थापन झाले आहेत. स्वयंसहायता गटांची वेगवेगळ्या स्तरावर नोंदणी केली जाते. ग्रामीण भागात  ग्रामीण मंत्रालय च्या अंतर्गत नोंद केली जाते , ग्रामपंचायत, पंच्यात समिती च्या मार्फत हे गट नोंदविले जातात, शहरी भागात नगरपालिका, महानगरपालिका मधे हि गट नोंदविले जातात . देशात एकूण किती गट आहेत याचा एकदा देता येत नाही. तरीही NRLM मार्फत दिलेल्या आकडेवारी नुसार ७७,९६,196 गट तयार झाले गट आहेत यामध्ये बिहार हे राज्य सर्व प्रथम येते १० लाख पेक्षा जास्त गटांची नोंद आजतागायत जगले त्यानंतर वेस्ट बंगाल ,आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश तर महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक लागतो महाराष्ट्र मधे ५ लाख सत्तर हजार पेक्षा जास्त गटांची नोंद आहे. एका गटात साधारण १० ते २० महिला जोडलेल्या असतात याचा अर्थ जवळपास ११ ओटी पेक्षा जास्त महिला या स्वयंसहायता चालवली सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तर ८० लाख पेक्षा जास्त महिला या चळवळीचा भाग आहेत. हा एकदा फक्त ग्रामीण भागातील जोडले गेलेल्या गटांचा आहे या व्यतिरिक्त शहरी भागातील नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वयंसेवी संस्था, बँक यांच्या आकडेवारी चा अभ्यास केला तर हा याची व्याप्ती चे मोजमाप नाही. 

 



स्वयंसहायता चळवळीचे अपयश : 

एवढी मोठी चळवळ उभी राहूनही देशाच्या आर्थिक विकासात महिलांचे योगदान अगदीच नगण्य आहे. देशाच्या GDP ग्रोथ मध्ये याचे प्रमाण 17 % पर्यंत सांगितले आहे तर जगाच्या तुलनेत भारतीय महिलांचे देशाच्या विकासातील योगदान अवघे  27 % सर्वे मध्ये सांगितले आहे. 
चळवळी मार्फत महिलांचे योगदान वाढायला हवे होते परंतु ते वाढताना दिसत नाही याची अनेक करणे आहेत परंतु चालवली च्या दृष्टीने विचार केला तर.
१. विखुरलेली यंत्रणा किंवा कार्य पद्धती देश पातळीवर किंवा राज्य पातळीवर या चळवळीला योग्य नेतृत्व आणि कार्य पद्धती आखणे गरजेचे आहे, अनेक संस्था, संघटना यावर काम करतात परंतु यावर ठोस अशी यंत्रणा नाही.
२. स्वयंसहायता गटांची नोंदणी विविध भागात विविध पाठातीने केली जाते त्याला एकसूत्री पण नाही तसेच एक ठोस नोंदणी प्रणाली नाही जी सर्व ठिकाणी एकसारखी राबविली जाते.
३. राजकीय हस्तक्षेप बऱ्याच वेळा गट हे राजकीय हेतूने तयार केले जातात त्यामुळे मुळातच त्यांचे अस्तित्व कायम स्वरूपी किंवा योग्य प्रणालीतून होत नाही.
४. विविध योजना बचत गटांच्या साठी सरकार कडून राबविल्या जातात परंतु या योजना राबवित असताना गरज लक्षात घेऊन वेळो वेळी निकष बदलून राबविल्या जात नाहीत.
५. ग्रामीण भागामध्ये या गटांसाठी सरकारच्या अनेक योजना असतात तसेच नाबार्ड, उमेद, माविम सारख्या बऱ्याच संघटना हि चांगल्या पद्धतीने काम करतात परंतु शहरी भागात स्वयंसहायता गटावर काम करणारी यंत्रणा किंवा संघटना तसेच योजनांचा अभाव दिसतो.
६. ग्रामीण तसेच शहरी भागातील बचत गटांचे निकष तपासून, गरज लक्षात घेऊन तसेच उद्योग व्यवसायाला चालना देणारे उपक्रम किंवा कार्यप्रणाली चा वापर केला तर नक्कीच भारतीय अर्थव्यस्थेत महिलांचे योगदान वाढायला मदत होईल. 

सारांश :

बचत गट (shg ) हि भारतातील सर्वात मोठी चळवळ आहे हि समजण्यासाठी त्याचा इतिहास आणि उद्देश माहित असणे गरजेचं आहे तसेच या चळवळीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम आहे. परंतु याकडे गांभीर्याने बघितले जात नाही. जर या चळवळी ला योग्य पद्धतीने हाताळण्यात आले तर यामुळे महिलेची आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल, महिलांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान वाढण्यास निश्चितच मत्य प्रमाणात मदत होईल परिणामी देशाच्या , राज्याच्या आर्थिक विकासाला हि होता हातभार लागेल.

नोंद : आजच्या बॉग मध्ये स्वयंसहायता गट (shg ) म्हणजेच बचत गट याची व्याप्ती आणि इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला आहे,  पुढच्या ब्लॉग मध्ये स्वयंसहायता गट कसे स्थापन करायचे ताची करप्रणाली तसेच नियम याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. 
"Feminism isn't not about making women 
Stronger, women are already strong .
It's about changing the way,
The world perceives that strength".
                                           G. D. Anderson.


सौ. मेघा हणमंत पवार .

बचतगट (SHG ) संकल्पना, व्याप्ती आणि आणि इतिहास. (महिला सक्षमीकरण )

  स्वयंसहायता गट म्हणजेच बचत गट त्यालाच (धग ) म्हणले जाते. १० ते २० महिला एकत्र येऊन एक गट स्थापन करतात आणि त्या मार्फत एकमेकांच्या गरज भागव...