Thursday 28 May 2020

MSME (Micro,Small& Medium Enterprises)

Msme(Micro,Small& Medium Enterprises)

Covid 19 चा परीणाम देशातल्याच नव्हे तर जगातल्या उद्योग व्यवसाय वर झालेला दिसतो येणाऱ्या भविष्यात उद्योग व्यवसाय टिकवणे आणी वाढविणे हे महत्वाचं आहॆ, त्या दृष्टीने नवीन योजना प्रत्येक देश राबवित आहॆ त्याच प्रमाणे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारतामधेही तशी पावले उचलली जात आहेत. MSME साठी सरकाने काही नवीन योजनांची घोषणा केली आहॆ, आता MSME म्हणजे काय तर (Micro,Small & Medium Enterprises) सूक्ष,लघु आणी मध्यम उद्योग. 


MSME ची स्थापना : 
आक्टोबर 1999 साली लघु उद्योग व कृषी व ग्रामीणउद्योग मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. सप्टेंबर 2001मधे याचे विभाजन लघु उद्योग मंत्रालय आणी कृषी व ग्रामिण उद्योग मंत्रालय असे झाले. 9 मे 2007 साली या दोन्ही मंत्रालयाचे विलीनीकरण करून MSME ची स्थापना झाली म्हणजेच सूक्ष्म, लघु आणी मध्यम उद्योग मंत्रालय. लघु उद्योगांना चालना आणी प्रोत्साहन देण्याचे काम या मंत्रालयाकडे सोपविण्यात आले. तंत्रज्ञान सुधारणे, बाजारपेठेचा विस्तार करणे, उत्पादन क्षमता वाढविणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे यासाठी या मंत्रालयामार्फत उपाययोजना राबविल्या जातात.भारताच्या अर्थव्यवस्थेत MSME ची खुप महत्वाची भूमिका आहॆ. भारतात जवळपास 12.5 million MSME आहेत, तर 30 million एम्प्लॉई इथे काम करतात, भारताच्या एकूण इंडस्ट्रिअल प्रोडक्शन मधे 50% प्रोडक्शन MSME मार्फत केले जाते, तर एक्स्पोर्ट मधे 45% योदान आहॆ .म्हणुनच देशाचा आर्थिक विकास होण्यासाठी MSME चा विकास होणे गरजेचे आहॆ.

MSME म्हणजे काय .
कोणताही उद्योग सुरु करायचा म्हणलं की उद्योगाच्या कॅटेगरी नुसार वेगवेगळ्या रजिस्ट्रेशन ची ( license)ची गरज असते यात सर्वात महत्वाचं म्हणजे MSME रजिस्ट्रेशन. MSME म्हणजेच उद्योग आधार आह हे बऱ्याच जणांना अजुन माहीत नाही. अगोदर शॉप ऍक्ट हे लायसन समजलं जायचं, त्यानंतर SSI काढावे लागायचे तर MSME मधे नोंद होत होती. आता बदललेल्या परिभाषे प्रमाणे उद्योग आधार हे कोणताही उद्योग सुरु करण्यासाठीचे एक लायसन आहॆ आणी MSME रजिस्ट्रेशन हि. आपल्या उद्योगाचे आपण MSME रजिस्ट्रेशन केले असेल तर आपल्याला MSME मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेता येतो. MSME/ SSI / Udyog aadhar हे एकाच आहेत.

MSME चे फायदे :
1) व्यवसायिक बँक कर्ज घेणे सोपे होते .
2) विजबिलामध्ये सवलत .
3) भारत सरकार अंतर्गत मान्यता प्राप्त 
4) सरकारी प्रोत्साहन योजना ,अनुदान यांचा लाभ घेता येतो.
5) कर कायद्या अंतर्गत सुट.
6) ट्रेडमार्क नोंदणीवर फी च्या 59% सुट मिळते .
7) बँकेत चालु खाते सहज उघडता येते .
8) मजुरी परवाने ,नोंदणी मिळवणे सोपे .
9) बँकेतील ओव्हरड्रॅफ्ट च्या दरामध्ये 1% ची सुट मिळत.

MSME कश्या पद्धतीने काम करते .
MSME मधे रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या उद्योगाला कसा फायदा होतो यासाठी MSME नीट समजुन घ्यायला हवे. MSME मधे रजिस्ट्रेशन करण्यासाठी क्रायटेरिया तयार केला आहॆ. आपण कोणत्या क्रायटेरियात बसतो त्याप्रमाणे आपल्याला योजनेचा लाभ घेता येतो. MSME ने उद्योगांचे 2 भागांमध्ये विभाजन केलं आहॆ. 
1) मॅनुफॅक्चरिंग इंडस्ट्री 
2) सर्व्हिस इंडस्ट्री 
लघु ,सूक्ष्म आणी मध्यम उद्योग कोणते हे ओळखता येण्यासाठी एक क्रायटेरिया दिला आहॆ, रजिस्ट्रेशन करताना या क्रायटेरियाचा विचार करूनच नोंदणी केली जाते.


या प्रकारे क्रायटेरिया इन्व्हेस्टमेंट नुसार तयार करण्यात आला होता. पण आता यात बदल करण्यात आला आहॆ. काही दुवसांपूर्वी फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी 12 मे ला नवीन क्रायटेरिया जाहीर केला आहॆ तो रिव्हाईज करून पुढील प्रमाणे आहॆ.

या तक्त्यात दिल्या प्रमाणे आणी आपण मॅनुफॅक्चरिंग मधे येतो की सर्व्हिस क्षेत्रात तसेच इन्व्हेस्टमेंट आणी टर्नओव्हर च्या कोणत्या कॅटेगरीत आपण बसतो याचा विचार करून रजिस्ट्रेशन करायचे असते .

MSME रजिस्ट्रेशन प्रोसेस: 
MSME मधे आपल्या उद्योगाचे रजिस्ट्रेशन करणे अगदी सोपे आहॆ आणी ऑनलाईन आहॆ याला कोणतीही फी द्यावी लागत नाही. आपण स्वता घरीच हि नाव नोंदणी करू शकतो. यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. एसएमई नावनोंदणी साठी मालकाला एक फॉर्म भरणे आवश्यक आहे, तो ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरू शकतात. ऑनलाईन नोंदणीसाठी अर्जदाराने अधिकृत साईट वर जाऊन फॉर्म भरावा लागतो .
या फॉर्म मध्ये व्यवसाय, बँक खाते, मालकी आणि रोजगार तपशील आणि इतर  तपशील द्यावा लागतो व्यक्तीस त्याचे स्वत: चे प्रमाणित प्रमाणपत्रे नमुद करावी लागतात,या प्रक्रियेसाठी कोणतीही नोंदणी फी भरणे आवश्यक नाही. तपशील भरल्यानंतर आणि ती अपलोड केल्यानंतर नोंदणी क्रमांक तयार केला जातो आणि तो  दिलेल्या ईमेल वर पाठविला जातो.
आवश्यक गोष्टी 
1) आधार कार्ड 
2) पॅन कार्ड 
3) कंपनी चे नाव आणी संपुर्ण पत्ता 
4)बँक डिटेल. 
5) नंबर of एम्प्लॉयी 
या दिलेल्या लिंक वर जाऊन आपले उद्योग आधार / MSME रजिस्ट्रेशन आपण करू शकता .


MSME च्या योजना 
सूक्ष्म, लघु आणी माध्यम उद्योग मंत्रालयामार्फत आत्ता पर्यंत बऱ्याच योजना राबविल्या आहेत. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, खादी तसेच जिल्हा उद्योग केंद्रातून राबविल्या जाणाऱ्या योजना, लोन सबसिडी च्या योजना, वूमन एम्पावरमेंट योजना, स्किल डेव्हलपमेंट च्या योजना, मुद्रा लोन, स्टार्टअप लोन अश्या बऱ्याच योजना राबविल्या जातात. खाली दिलेल्या लिंक जाऊन तुम्ही सर्व योजना पाहु शकता.

काही दिवसांपूर्वीच मा.निर्मला सीतारामन यांनी covid 19 पार्श्वभूमीवर काही नवीन योजना MSME मधे आणल्या आहेत. यातील 5 महत्वाच्या योजना पुढील प्रमाणे .

1) तारणमुक्त कर्ज : 100 कोटी टर्नओव्हर असणारे उद्योग 25 कोटी पर्यंत लोन घेऊ शकतात पहिल्या वर्षी कोणतीही मुद्दल परत फेड करावी लागणार नाही, व्याज हि कमी असेल हि परतफेड 4 वर्षाची असेल या लोन साठी सरकार स्वता ग्यारंटर असणार आहॆ त्यामुळे कोणतेही तारण देण्याची गरज नाही. याची मुदत 31ऑकटोम्बर 2020 आहॆ.

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत ..

2) 200 कोटी पर्यंत च्या टेंडर मधे तरतुद : आता 200 कोटी पर्यंतचे टेंडर हे ग्लोबल टेंडर असणार नाहीत म्हणजे आता हे टेंडर भारतीय उद्योगच भरू शकतील बाहेरच्या कंपन्यांना असे टेंडर भरता येणार नाहीत त्यामुळे स्वदेशीचा चालना मिळेल.
3) EPF सपोर्ट : यामध्ये ज्या उद्योगांमध्ये 100 कर्मचारी आहेत व त्यांचा रोजगार 15000 पर्यंत आहॆ त्यांचा 3 महिन्याचा ( मार्च ते मे )EPF सरकार भरणार आहॆ तो कालावधी वाढवुन आता ऑगस्ट पर्यंत केला आहॆ.  
4) बांधकाम उद्योग ला मदत : यामध्ये नवीन प्रोजेक्ट नोंदणी आणी चालु प्रोजेक्टच्या पूर्णत्वाची तारीख यामध्ये 6 महिन्यांची मुदतवाढ दिली आहॆ. 
5) टॅक्सेस मुदत वाढ : IT रिटर्न भरण्याची तारीख जी 31 जुलै पर्यंत होती ती आता वाढुन 30 नोव्हेंबर केली आहॆ. तसेच TDS हि 25% कमी करणार असल्याचे सांगितले आहॆ .
हे फक्त महत्वाचे मुद्दे होते याची संपुर्ण माहिती वर दिलेल्या लिंक वर दिलेली आहॆ.

MSME ची महिती आणी योजना जास्त आहेत त्या सर्व एका ब्लॉग मधे मांडणे थोडे कठीण आहॆ त्यामुळे फक्त महत्वाचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला आहॆ. MSME च्या साईट वर जाऊन संपुर्ण महिती घेऊ शकता ...


 
Thanking You.
Mrs. Megha Pawar.

Join us 
Buying & selling E-Commerce platform .



  

Saturday 16 May 2020

चायना आणी भारतीय इकॉनॉमी .

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण काही ब्लॉग च्या माध्यमातून कोरोनाचा लघु उद्योगांवर होणारा परीणाम आणी त्यातुन उदयास येणाऱ्या नवीन वाटा यावर आपण महिती घेण्याचा आणी त्याचा वापर करून आपल्या उद्योगाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करत आहोत ..

चायनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परीणाम 


Covid 19 या विषाणूला चायनीज व्हायरस म्हणुन काही जण उल्लेख करत आहेत याच कारण हा चीन च्या हुवाण शहरातुन जगभरात पसरला आहॆ. काही जणांचं म्हणणं आहॆ की हा मानव निर्मित विषाणु आहॆ. त्यामुळे सर्वच देशांना  मोट्या संकटाना तोंड द्यावं लागत आहॆ. चीन मात्र या संकटातुन बाहेर पडत आहॆ. आणी त्यांची अर्थ व्यवस्था ही पुन्हा सुरळीत होत आहॆ . त्यामुळे संपुर्ण जगाची नाराजी चीन वर आहॆ. भारतात ही स्वदेशीचा स्वीकार करावा असे आवाहन केल जात आहॆ तर चिनी मालावर बहिष्कार करावा असं सर्वांचं म्हणणे आहॆ. पण हे किती शक्य आहॆ याचा ही विचार करायला हवा. 1978 साली मागास असलेला देश आज जगात 2 नंबरचा सर्वात प्रगत देश कसा झाला याचा ही थोडासा आढावा घ्यायला हवा, चायना वस्तूंवर आज आपण बॅन आणलं तरी उद्या दुसरा कोणता तरी देश येईल आणी पुन्हा तेच होईल त्यापेक्षा आपण कोठे कमी पडतोय हे पाहणं महत्वाचे. चायनाने एवढ्या लवकर प्रगती कशी केली याचा अभ्यास थोडा करावा, नाहीतर आता चायना आहॆ उद्या दुसरा कोणता तरी देश भारतात येऊन पुन्हा मार्केट काबीज करेल. कोरोनाच संकट चायनाने आणलं की नाही हे नक्की माहीत नाही पण त्यांनी त्या संकटावर खुप लवकर मात केली हे मात्र खरं आहॆ जे अजुनही कोणत्याच देशाला जमलेलं नाही. 


1978 पूर्वी चायना एक मागास देश होता. 1980 साली चायनाने प्रगती करायला सुरवात केली आणी या 2018 पर्यंत एक महासत्ता बनला... हे कशामुळ ? 1990 साली त्यांचं आऊटपुट व्हॅल्यु 3% होती ती 2018 मधे वाढुन 25% एवढी झाली. जगातील कित्तेक वस्तूंच्या प्रोडक्शन मधे चायना 1 किंवा 2 नंबर ला आहॆ. जगातले 80% एअरकंडिश्नर चायना मधे बनतात, 70% मोबाईल चायना मधे बनवले जातात, शूज 60%, कोल 50%, स्टील 50%, जगात  सगळ्यात जास्त अँपलस चायना मधे पिकतात, USA 2 नंबर ला आहॆ तरी त्यांचं उत्पादन अवघे 6% आहॆ. खेळणी बनवण्यात चायनाचा जगात 1नंबर लागतो तर युरोप 2 नंबर ला आहॆ. आपल्या घरातील जवळपास 80% इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये चायनाचे पार्ट बसवलेले असतात ,घडाळ्यातील सेल असो किंवा मोबाईल ची बॅटरी, टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर मधील पार्ट किंवा AC असो सर्वामध्ये चायनाचा एक तरी पार्ट वापरला जातोय. आपला गैरसमज आहॆ की चायना फक्त डुबलीकेट माल बनवतो पण तसे नाही जगातील सर्वात जास्त ब्रँडेड वस्तु चायनाच्याच  आहेत.

चायनाचे भारतातील मार्केट 


भारतीय मार्केट मधे चायनाने खुप मोठा जम बसवला आहॆ. मास प्रोडक्शन आणी कमी किंमत यामुळेच भारतीय मार्केट उठवण्यात चायनाला यश आलं आहॆ. चायनीज मालावर बहिष्कार करणं हा यावर चांगला उपाय आहॆ पण त्याही पेक्षा त्या वस्तुंना पर्याय उपलब्ध करून देणं हे गरजेचं आहॆ. पण असे नियम कदाचीत सरकार बनवु शकणार नाही कारण चायना भारतातुन सर्वात जास्त म्हणजे 20% माल  आयात करतो  तेल ,सोने ई .
  • चायनाचे भारतातील सर्वात मोठे होलसेल मार्केट दिल्ली आणी मुंबई ला आहेत . इथुनच सर्व माल संपुर्ण देशात पसरवला जातो.
  • भारतात दिवाळीत जेवढी दिवाळी साजरी केली जात नाही तेवढी चायना मधे केली जाते, कारण दिवाळीत सर्वात जास्त  म्हणजे 80% दिवाळी लॅम्प, लाईट्स, एलईडी बल्प चायनातून येतात. पण मागच्या 2 वर्षात चायनीज दिव्यावर काही ठिकाणी बहिष्कार टाकला त्यामुळे चायनाच्या मार्केट ला चांगलाच फटका बसला होता. यात हायद्राबाद शहरात सोशिअल मीडिया वर व्हायरल मेसेज ला खूपच प्रतिसाद दिला आणी त्याचा परीणाम हायद्राबाद मधे दिवाळीत चायनीज माल चा स्टॉक केला जात नाही .
  • चायनातून भारतात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या वस्तु म्हणजे दिवाळी दिवे, आकाशकंदील, लहान मुलांची खेळणी, योगा मॅट, मोबाईल & इलेक्ट्रॉनिक वस्तु,  डेटा केबल, एलईडी लॅम्प, लेदर जॅकेट , ब्युटी प्रॉडक्टस  ई . 
  • भारतात चायना चे कपडे आणी सौंदर्य प्रसादाने, फॅशन ऍक्सेसरीज चे मार्केट ही मोठे आहॆ कारण रिबॉक, नाईकी, ऍडीडास अश्या प्रसिद्ध ब्रँड ची प्रतिकृती ही बनते. 
याच बरोबर अनेक ब्रँडेड वस्तु ही भारतात चायना कडुन आयात केल्या जातात अश्या प्रकारे चायनाने संपुर्ण सर्व सामान्यांचे मार्केट काबीज केलं आहॆ त्यामुळे भारतीय लघु उद्योगाला मोठा फटका बसला .

 चायनाची काम करण्याची पद्धत खुपच पद्धतशीर आहॆ .



1) मास प्रोडक्शन : म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूच प्रोडक्शन सुरु करायचं असेल तर ते खुप मोट्या प्रमाणात करायचं आणी बाजारात तो अश्या पद्धतीने फेकायचा की सर्व स्पर्धकच  संपतील. मास प्रोडक्शन मुळे प्रोडक्शन कॉस्ट कमी होते, ट्रान्सपोर्टेशन खर्च, लाईट असा सर्वच खर्च कमी होतो परिणामी वस्तूची किंमत कमी होते .


2) कॉपी पेस्ट सिस्टीम : चायना मार्केट मधे खूपच अपडेटेड असते त्यामुळे जगात कुठलीही नवीन वस्तु लॉन्च झाली की त्याचे काही पीस मागवायचे आणी ते खोलून पहायचे,  तसेच पार्ट मोठ्या प्रमाणात बनवून कॉपी करून तशीच वस्तु बनवायची त्यामुळे त्यांचा R& D चा खर्च वाचतो , इनोव्हेशन चा खर्च वाचतो आणी वेळ ही वाचतो. 


3) प्रोडक्टीव्ह लेबर : चायनाची 3 री मोठी गोष्ट म्हणजे लेबर बऱ्याच जणांचा गैरसमज आहॆ की चायनाचे लेबर स्वस्त आहेत म्हणुन बाकीचे देश तिथे इन्व्हेस्ट करतात पण तस नाही चायनाचे लेबर प्रोडक्टीव्ह आहेत, आपल्या इथे जर एक लेबर 8 तासात 4 मोबाईल बनवत असेल तर चायनाचा लेबर 8 तासात 10 मोबाईल बनवतो एवढा तो स्किल्ड असतो. कारण चायनीज गव्हर्मेंट स्किल डेव्हलपमेंट वर जास्त भर देते.

4) शिक्षणाचा दर्जा : चायना मधे शिक्षणाचा दर्जा चांगला आहॆ, एक्स्पर्टीज वर तिथे भर दिला जातो, लहान वयापासूनच त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज आणी अपडेट टेक्नॉलॉजि ची महिती दिली जाते.   

5) इन्फ्रास्टक्चर आणी इंडस्ट्रिअल हब : हा ही चायनाचा विकासाचा महत्वाचा भाग आहॆ. चायनीज सरकार तेथील उद्योगांना चालना देत असते त्यामुळे तिथे वेगवेगळे हब तयार केले जातात. म्हणजे एखादी कंपनी मोट्या प्रमाणात एखाद्या वस्तूच निर्मिती करत असेल तर खुप कमी किमती मधे लाईट पाणी आणी,bचांगले इन्फ्रास्टक्चर उभे केले जाते तसेच लागणारा कच्चा माल ही त्याच सिटी मधे उपलब्ध होईल याची सोय केली जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रांस्पोर्टेशन खर्च वाचतो, वेळ वाचतो आणी रोजगार निर्मिती ही होते. उदाहरण म्हणजे जर चायनाला AC तयार करायचा आहॆ तर त्यासाठी लागणारा कच्चा माल बनविणाऱ्या कम्पन्या ही त्याच शहरात उभ्या केल्या जातात. बाहेरून आणण्याची गरज पडत नाही रोजगार निर्माण होतो, लेबर ला राहण्यासाठी कन्स्ट्रक्शन उभे केले जातात, त्यामुळे त्यावर आधारित बरेच लघु उद्योग तयार होतात अश्या प्रकारे इंडस्ट्रियल हब तयार होतो .

चायनीज इकॉनॉमी ग्रोथ मधे महिलांची भागीदारी ही मोट्या प्रमाणात आहॆ . पुरुषांच्या मानाने 74% महिलांचा सहभाग कामामध्ये दिसुन येतो. अमेरिके नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात तेथील महिला देशाच्या इकॉनॉमी मधे सहभाग नोंदवतात. 

नुकताच चायनाने हेल्दी महिला धोरण 2030 राबविण्यास सुरवात केली आहॆ. यात महिला व मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नवीन उपाय योजना राबविल्या जाणार आहेत.


चायना हा एक कम्युनिस्ट वादी  देश आहॆ. इथे एक केंद्री सत्ता चालते त्यामुळेच विरोधक नसतात निर्यण घेणे सोपे असते, पुढच्या 25 वर्षांचा विचार करून आराखडा तयार करून निर्णय घेतले जातात, नवीन उद्योजकांना, लघु उद्योजकांना प्रोत्साहन दिलं जाते. सरकार त्यांना सर्वोतपरी मदत करते, तेथील मुलांना परदेशात जाऊन शिकण्यासाठी प्रेरित केलं जाते, महिलांच्या विकासासाठी आणी इकॉनॉमी मधे सहभाग वाढावा म्हणुन योजना राबविल्या जातात. कोणत्याही देशात उद्योग सुरु करण्याअगोदर तेथील परिस्थीचा अभ्यास केला जातो आणी त्याप्रमाणे तिथे उद्योग सुरु केला जातो .

भारतातील परिस्थिती 


या उलट भारताची परिस्थिती आहॆ, भारतात परदेशी उद्योग गुंतवणूक करायला घाबरतात कारण भारतीय व्यवस्थेची अस्तिरता, भारतात एक निर्णय घेण्यासाठी कित्तेक विरोधकांना सामोरे जावे लागते, भारतात प्रत्येक निर्णय 5  वर्षाचा विचार करून केला जातो, रस्ते, ट्रान्सपोटेशन यामुळे कॉस्ट वाढते , कामाची सरकारी पद्धत, स्किल लेबर न मिळणे आणी धरणे, आंदोलन, बंद या गोष्टीमुळे काम करण्यात अडथळा निर्माण होतो यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर भारतात इन्व्हेस्ट करायला घाबरतात, भारतातील शिक्षणाचा दर्जा तेवढा आधुनिक किंवा प्रॅक्टिकल नाही. शिवाय आपली मानसिकता उद्योजकाची नाही आपण जेव्हा काम करतो तेव्हा घर चालवने,घर,गाडी,बांगला आणी सेव्हिंग हाच उद्देश असतो पण चायना किंवा अमेरिका सारख्या देशात देशाच्या इकॉनॉमीत सहभाग महत्वाचा समजला जातो, भारतात उद्योजकते मधे महिलांचा सहभाग खुप कमी आहॆ आणी त्याकडे सरकारच दुर्लक्ष ही आहॆ, भारतातील तरुण वर्ग शिक्षण, उद्योग या कडे लक्ष देण्यापेक्षा जातीयवाद, राजकारण, धर्म याकडे जास्त ओढला जातो. उद्योग व्यवसाय करण्यापेक्षा नोकरी करणे हे तरुणांना सोपे वाटते,  उद्योग वाढीसाठी उपाय योजना राबविण्यात तसेच तरुणांना उद्योग व्यवसाय करण्यास प्रवृत्त करण्यात सरकारला तितकस यश आलेलं नाही . भारतात रोजगार निर्मितीचा वेग कमी आहॆ. 2012 to 2018 मधे भारतात 6.1 दशलक्ष एवढे रोजगार गमावले आहेत. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकी पूर्वी बेरिजगारीत 45 वर्षातील उच्चांकी नोंद केली. स्किल डेव्हलपमेंट ची सुरवात आता होत आहॆ. त्यामुळे त्याला वेळ लागत आहॆ .

भरता समोरील नवीन संधी

भारतात एक संमिश्र अर्थव्यवस्था आहॆ, आणी हेच आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहॆ , जगत सर्वात जास्त प्रगती करणारा देश म्हणुन 2 नंबर ला भारत आहॆ . मुळात भारतीय अर्थव्यवस्था सेवा क्षेत्रावर आधारित आहॆ (जीडीप च्या 60%) 53% लोक आजही शेती करतात .
  • जिडीपी ग्रोथ रेट मधे अर्थीक वर्ष 18-19 च्या पहिल्या तिमाहीत 5% होता  तर चीन चा दुसऱ्या तिमाहीत 6.2 % होता जीडीपी वाढीच्या ग्रोथ मधे भारत आता चीन च्या ही पुढे जात आहॆ .
  • चायना आज प्रगत देश असला तरी चायनाचे प्रशासन हाच सर्वात मोठा धोका चायनाला आहॆ, तेथील लोकांना विरोध करण्याचा अधिकार नाही, त्यांच्याकडे पूर्ण स्वातंत्र नाही, चायना सध्या प्रदूषणाच्या मोठ्या समस्या ला सामोरे जात आहॆ, कम्युनिस्ट पक्षाच्या हातात संपुर्ण देश असल्याने न्याय व्यवस्था निपक्षपाती नाही. तसेच चायनाची वृत्ती संपुर्ण जगावर राज्य करण्याची आहॆ त्यामुळे विरोधक ही वाढले आहेत, चायनाने खुप लवकर प्रगती केली तरीही मागच्या काही वर्षात ग्रोथ रेट कमी झाला आहॆ. एका ठराविक काळानंतर चायनाचा विकास दर स्थिर राहील म्हणजेच वेग कमी होईल आणी कोरोनामुळे जर काही देशांनी चायना मधील इन्व्हेस्टमेंट काढुन घेण्याचा निर्णय घेतला तर याचा परीणाम चायनावर खुप मोठा होऊ शकतो.
  • चायना नंतर इन्व्हेस्टमेंट साठी भरत देश सर्वाना अनुकूल समजला जात आहॆ. त्यामुळे 300 हुन अधीक कंपन्यांनी बोलणी सुरु केली आहॆ. त्यामुळेच भारतात आता नवीन संधी तयार होत आहेत .
  • कोरोनामुळे आता देशासमोर नवीन संधी निर्माण झाली आहॆ . विदेशी मालाचा वापर न करता स्वदेशीचा स्वीकार केलातर अनेक नवीन उद्यो तयार होतील , पण त्यातही जर आपण विचार केला तर ब्रँडेड वस्तु किंवा मोट्या कंपन्यांच्या वस्तु विकत घेण्यापेक्षा छोटे व्यापारी, लघु उद्योग, महिला उद्योग यांचा वस्तु खरेदीला प्राधान्य दिले तर, संपत्तीचे केंद्रीकरण कमी होईल, परिणामी दारिद्र्य रेषेखालचा, मध्यम वर्गीयानाचा दर्जा सुधारेल. शेती हा आपल्या देशाचा कणा आहॆ त्यामुळे शेती तसेच शेत मालावर प्रक्रिया  उद्योग यावर भर दिला तर  निर्यातीचे प्रमाण ही वाढेल . 
कोरोना व्हायरस मुळे देशा समोर खुप मोठे संकट उभे राहिले आहॆ, कोट्यवधी कामगार आणी त्यांच्या कुटुंबाच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहॆ. यामध्ये बांधकाम मजुर, वाहतुक कामगार, घरकाम करणारे, पथ विक्रेते , छोटे दुकानदार , कचरा गोळा करणारे, हॉटेल मधे काम करणारे, रस्त्यावरील छोटे विक्रेते, छोट्या कम्पन्यातील कामगार, हमाल अश्या लेबर लोकांचा समावेश आहॆ आणी हा आपल्या देशाच्या इकॉनॉमी चा सर्वात मोठा भाग आहॆ. या संकटावर मात करण्यासाठी या वर्गाचा विचार करून नवीन आर्थिक धोरणे राबविणे गरजेचे आहॆ, 30 वर्षात जर चीन पुढे जाऊ शकतो तर पुढच्या 25 वर्षाचा विचार आपण केला तर भारत देश ही जगातील सर्वात मोठी महासत्ता होऊ शकतो ....

That some achieve great success, is proof to all that others can achieve it as well.

Thanks & T.c , be safe .

Mrs. Megha Hanmant Pawar 🙏



Sunday 10 May 2020

कोरोना covid 19 बदलनारी उद्योग परिस्थिती आणी नवीन संधी ...

Covid 19 आणी देशाची अर्थव्यवस्था
कोरोना मुळे बदलणारी देशाची अर्थव्यवस्थेवर त्यावर होणारे दुष्परिणाम आणी त्यातुन निर्माण होणाऱ्या उद्योग संधी ,नवीन वाटा आपण या ब्लॉग मधे मांडण्याचा प्रयत्न केला आहॆ .

चीन मधुन या व्हायरस ची सुरवात झाली आणी संपुर्ण जग आज लॉकडाऊन झालं .... लॉकडाऊन मुळे संपुर्ण जगाचीच आर्थिक घडी विस्कळीत झाली आहॆ . एकाच वेळीसंपुर्ण जग लॉकडाऊन होण्याची ही पहिलीच वेळ आहॆ यापू असं झाल्याचं कोणताही उदाहरण इतिहासात नाही .याचे दूरगामी परिणाम जगाच्या अर्थ व्यवस्थेवर होणार आहेत .अमेरिका ,स्पेन ,इटली या सारख्या मोठया प्रगत देशांना याचा चांगलाच फटका बसला आहॆ , संपुर्ण देश आज एका भीतीच्या सावटा खाली आहॆ , भारतात कोरोनाचा प्रसार त्या मानाने  सावकाश होत आहॆ ,याला भारतीय संस्कृती आणी जगण्याच्या पद्धतीतील विविधता हे कारण असु शकते... त्यामुळे भारतावर त्याचा परिणाम कमी आहॆ असे बऱ्याच जणांकडून बोललं जात आहॆ , आणी म्हणुनच बाकीच्या देशानं पेक्षा आपल्या देशात आर्थिक नुकसान कमी होईल असा अंदाज ही लावला जातोय ... परंतु आपण हा ही विचार केला पाहिजे की भरत हा अजुनही अमेरिका, जपान इतका प्रगत नाही विकसन शील देश आहॆ शिवाय लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकाला आहॆ. आणी महत्वाचं म्हणजे 138 कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात वर्ल्ड बँकेच्या 2011 च्या सर्वे नुसार  फक्त
हायर अप्पर क्लास फक्त 1% आहेत (अंबानी ,टाटा ,बिर्ला यांच्या कडे देशातली सर्वात जास्त संपत्ती केंद्रित आहॆ ) तर हायर मिडल क्लास 3% तर लो इन्कम 76.9%  आणी दारिदय रेषेखालीजवळपास 20%आहॆ ..प्रगत देशात या उलट परिस्थिती दिसुन येते .हे सांगण्याचं कारण असं संपत्तीचं केंद्रीकरण झाल्याने कोरोनाचा सर्वात जास्त फटका मिडल क्लास आणी लोवर क्लास लोकांनाच बसणार आहॆ .
आर्थिक तज्ज्ञांच्या मते आणी वर्ल्ड बिझनेस ऑर्गनायझेशन नुसार भारतात 20% ते  57% लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहॆ . 53% उद्योग क्षेत्रावर  कोरोनाचा परिणाम होत आहॆ .तर भारतात रोज 32 हजार कोटींचं नुकसान होत आहॆ .याचाच परिणाम लेबर वर्ग ,कामगार वर्ग यांच्यावर मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहॆ हे आपण रोज पहाताच आहोत. त्यांच्यावर उपास मरीची वेळ आली आहॆ म्हणुनच प्रत्येक जण आपलं गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहॆ . हे सर्व खरं तर खुप भयानक आहॆ .देशात कोरोनाचा प्रसार बाकीच्या देशांच्या मानाने कमी असला तरी याचा परिणाम किती आणी कुठपर्यंत होईल हे सांगणे लगेच अवघड आहॆ .
यासाठी वर्ल्ड ऑर्गनायझेशने या परिस्थितीला 3 कर्व मधे मांडण्याचा प्रयत्न केला आहॆ.
Economical Curves


पहिला v कर्व म्हणजे कोरोना आला आणी वेगाने अर्थव्यवस्था खाली गेली पण कोरोना 2 ते 3 महिन्यात लगेच गेला तर त्याच वेगाने अर्थव्यवस्था पुन्हा वर येईल , दुसरा U कर्व यात कोरोना आला आणी काही काळ म्हणजे 4-6 महिने थांबला आणी गेला तर अर्थव्यवस्था वेगाने खाली येईल काही काळ स्थिर राहील  पुन्हा वाढीला लागेल तर तिसरा कर्व म्हणजे L यात कोरोना चा प्रादुर्भाव जास्त काळासाठी राहिला म्हणजे साधारण 6 महिन्या पेक्षा जास्त राहिला तर अर्थव्यवस्था पुन्हा वर येण्यासाठी बराच वेळ लागेल .आणी ही परिस्थिती देशासाठी खुप गंभीर असेल.
तिसरा कर्व येणार नाही असा अंदाज आहॆ . दुसऱ्या कर्व चे परीणाम आपल्या देशात दिसतील अशी परिस्थिती आहॆ .
त्यानुसारच आपण उद्योग आणी व्यवसाय वर कसा परीणाम दिसुन येतो ते ही पाहू ..
Covid 19.... मुळे धोक्यात असणारे उद्योग ..
1.  एअरलाईन्स ,हॉटेल आणी टुरिजम
2.  ऍटोमोबाइल इंडस्ट्री
3.  रियल इस्टेट आणी त्या शी रिलेटेड बिल्डिंग मटेरिअल ,          सिमेंट .
4.  होम & ऑफिस फुर्निचर
5.  प्रिंटिंग आणी स्टेशनरी ,गिफ्ट , बुक्स
या सेक्टर वर सर्वात जास्त परिणाम कोरोनाचा होईल परिणामी यावर अवलंबून असलेल्या उद्योगांवर ही छोटे उद्योग , midc मधील वर्क शॉप यावर बंद होण्याची वेळ येऊ शकते.
यामुळेच भारतात बऱ्याच नोकऱ्या जातील तर काहींच्या पेयमेन्ट मधे घट करण्याचे निर्णय कंपनी मालकांना घ्यावे लागतील . बेरोजगारी वाढेल आणी शिक्षण घेऊन नुकतेच बाहेर पडलेल्या तरुण वर्गाला नोकरी मिळणे ही अवघड असेल . सांगण्याचं कारण की कोरोनाचा एवढा मोठा परिणाम होत असताना लॉकडाऊन चा गाम्भीर्य आणी अर्थ आपल्याला कळत नाही .त्यात आता लॉकडाऊन शिथिल होत आहॆ त्यामुळे याचे धोकेही तितकेच वाढले आहेत . काळजी घेणे आणी नियमांचं पालन करण गरजेचं आहॆ ... भीती सर्वांनाच आहॆ या परिस्थिती शी योग्य पद्धतीने जुळवून घ्यावं लागेल .
लॉकडाऊन सरकार जास्त दिवस ठेवु शकत नाही त्यामुळे आता आपल्याला जगण्याचे नियम बदलून याच्याशी जुळवून घ्यावं लागेल . आपलं राहणे ,खाणे ,वागणे काम करण्याची पद्धत सर्वच बदलावी लागेल , कोरोनाच्या परिस्थितीला ऍडजेस्ट करून नवीन नियम बनवावे लागतील तरच यातुन आपण व्यवस्थित बाहेर पडु ...

कोरोनातून निर्माण होणाऱ्या साधी 

कोरोनाची एक बाजू आपण बघितली आता दुसरी बाजू ही बघु .म्हणतात ना एका नाण्याला दोन बाजू असतात तश्या यालाही आहेत प्रत्येक वाईट परिस्थिती नंतर एक नवीन सुरवात असते ,आणी नवीन संधी ही निर्माण होत असते तसे कोरोनामुळे बऱ्याच नवीन साधी ही निर्माण झाल्या आहॆत .

अर्थव्यवस्थेला नवीन संजीवनी देणारे महत्वाचे मुद्दे  
1. देशाची लोकसंख्या जास्त असली तरी यात तरुण वर्ग जास्त आहॆ वर्ड डेमोग्राफिक ऑफ इंडिया च्या सर्वे नुसार 60% लोकसंख्या 20 te 60 ,वयोगटातील आहॆ आणी पुढच्या वर्षापर्यँत भारताच ऍव्हरेज एज 29 असेल म्हणजे सर्वात जास्त तरुण देश म्हणुन आपण ओळखले जाऊ .
2. हा व्हायरस चायनातून आल्यामुळे सर्व देशांची नाराजी चायना वर आहॆ याचाच परीणाम, बऱ्याच देशांनी चीन मधील असणारी त्यांनी इन्व्हेस्टमेंट हटवुन भारतात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत ,300 कंपन्यांनी तशी पसंती दर्शवली आहॆ त्यातील 100 कंपन्यांनी बोलणी आणी सर्वे चालु केला आहॆ ,यामुळे खुप मोठ्या प्रमाणात नोकऱ्या आणी लघु सुरु होतील .
3. आपला देश आजही कृषी प्रधान देश आहॆ 68.34% लोक आजही शेती करतात त्यामुळे ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्यात सर्वात जास्त वाटा शेती आणी त्यावर अवलंबुन असणाऱ्या उद्योगांचा असेल. कृषी क्षेत्रात 3% वाढ होण्याची शक्यता आहॆ .खऱ्या अर्थानं शेतकरी राजा असेल . शेती उपादने आणी शेती प्रक्रिया उत्पादने यांना चांगले मार्केट सध्या ही मिळत आहॆ .
 ही आपली जमेची बाजू आहॆ. कोरोना नंतर देशाचा चेहरा बदलेल, आर्थिक नवीन निकष तयार होतील . कृषी उद्योग लघु उद्योग ,महिला उद्योग याकडे दुर्लक्ष केलं गेले यात आता चांगली संधी निर्माण झाली आहॆ . कोणत्या उद्योगांना चांगले दिवस येतील , आणी कोणता उद्योग करणे आता हिताचे असेल ते आता बघु .

Covid 19 मधे चांगले दिवस येणारे उद्योग 
1. FMCG  प्रोडक्त्त यात पर्सनल केअर , होम केअर , फूड      उतपादने
2. हॉस्पिटल आणी फार्मा इंडस्त्र , आयुर्वेद ,होमियोपेथीक ,
3.  इंटरटेन्मेन्ट मेडीया ,शोशिअल मेडीया , ब्रॉडकास्ट मेडीया
4.  फिटनेस आणी सप्लिमेंट्स
5.  ऑनलाईन शॉपिंग  ,वेब लर्निंग आणी मिटींग्स , ई कॉमर्स
6.  कुरियर & लॉजिस्टिक .
7. सॉफ्टवेअर .
तसेच तरुण वर्गाने नोकरी शोधण्या पेक्स आलेल्या संधीचा फायदा उचललायला हवा , या इडंस्त्री मधे उद्योग सुरु केला तर भविष्य चांगले आहॆ .
तसेच वर्क फ्रॉम होम ची नवीन पद्धत आता सुरु होत आहॆ .त्यामुळे महिलांनी याचा फायदा उचलावा ,काही क्षेत्रात वर्क फ्रॉम होम चे जॉब सुद्धा निघतील , नवीन नोकरीसाठी बाहेर पडणार्यांनी ही कोणत्या क्षेत्रात चांगली नोकरी मिळु शकेल याचा आधी विचार करावा , ऑनलाईन शॉपिंग कम्पन्यामध्ये चांगल्या नोकरी च्या संधी निर्माण झाल्या आहेत याचंच उदाहरण म्हणेज अमेझॉन सध्या 1 लाख नवीन जागा भरती करण्याच्या तयारीत आहॆ .
अजुन एक खुप मोठी संधी आपल्या समोर आहॆ ती म्हणजे छोटे छोटे लघु उद्यो योग्य प्रशिक्षणाने महिला किंवा बेरोजगार सुरु करू शकतात . हा व्हायरस चायनातून आल्यामुळे संपुर्ण जगाची नाराजी चायनावर आहॆ याचाच परिणाम म्हणुन जर आपल्या देशात चायनीज वस्तूवर बहिष्कार लोक करत आहेत ,याचा फायदा तरुण वर्गाने आणी महिलांनी घ्यावा .
जर चायनीज वस्तुंना आपण पर्याय देऊ शकलो तर एक मोठी उद्योग साधी आपल्यासमोर असेल , यामध्ये महिला किंवा सामान्य व्यक्ती ही थोडस प्रशिक्षण घेऊन काम सुरु करू शकतो .
यात खेळणी उद्योग खुप मोठा आहॆ ,तसेच लाईट च्या माळा ,दिवे ,आकाशकंदील ,बल्प , टॉर्च  यासारख्या वस्तु महिला ही सुरु करू शकतात यात इन्व्हेस्टमेंट कमी आहॆ आणी कमी जागेत ही सुरु करता येऊ शकतो .
आताच्या परिस्थिती महिला व नवउद्योजकांना खुप चांगली संधी निर्माण झाल्या आहेत .
काही उद्यो पुढील प्रमाणे सुरु होऊ शकतात .
1.कृषी मालावर प्रकिया उद्योग , फळे आणी भाज्यांवर             प्रक्रिया करून सुरूहोणारे उद्योग
2. दूध व्यवसाय आणी दुधापासून बनविलेल्या वस्तु
3. माल घरपोच सेवा देणे
4. आरोग्य चांगले राहण्यासाठी बनविलेल्या वस्तु , जसे            च्वनप्राश , चूर्ण , व्हिटॅमिन सप्लिमेंट्स असे
5.ऑनलाईन बिजनेस , ऑनलाईन मार्केटिंग सेवा , सोशल 6. 6. मेडीया , ब्लॉगिंग , विडिओ मेकिंग etc
7. ऑनलाईन प्रशिक्षण , काउन्सिलिंग
8. हाऊस किपींग तसेच क्लीनिंग मटेरिअल बनविणे . जसे        फिनेल ,हॅन्ड वॉश ,सोप ,क्लीनर ,etc

अश्या उद्योगामध्ये तोड्याश्या प्रयत्नाने ही जम बसवता येऊ शकतो ...या संधीच फायदा घ्यावा आणी परिस्थीला ला एका पॉसिटीव्ह दृष्टीकोनातून बघावं तरच आपण लवकर बाहेर पडु यातुन .
शेवटी फक्त एवढंच जितक्या लवकर आपण जगण्याची नवीन पद्धत ,नवीन टेक्नॉलॉजि आणी प्रोसेस शिकुन घेऊ तितक्या लवकर आपण पुन्हा उभे राहु ..
Can You Be Part Of Faster Adoption Of  New  Technology & New Process...

Be safe & TC....

Mrs. Megha Hanmant Pawar.

बचतगट (SHG ) संकल्पना, व्याप्ती आणि आणि इतिहास. (महिला सक्षमीकरण )

  स्वयंसहायता गट म्हणजेच बचत गट त्यालाच (धग ) म्हणले जाते. १० ते २० महिला एकत्र येऊन एक गट स्थापन करतात आणि त्या मार्फत एकमेकांच्या गरज भागव...