Saturday 16 May 2020

चायना आणी भारतीय इकॉनॉमी .

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण काही ब्लॉग च्या माध्यमातून कोरोनाचा लघु उद्योगांवर होणारा परीणाम आणी त्यातुन उदयास येणाऱ्या नवीन वाटा यावर आपण महिती घेण्याचा आणी त्याचा वापर करून आपल्या उद्योगाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करत आहोत ..

चायनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परीणाम 


Covid 19 या विषाणूला चायनीज व्हायरस म्हणुन काही जण उल्लेख करत आहेत याच कारण हा चीन च्या हुवाण शहरातुन जगभरात पसरला आहॆ. काही जणांचं म्हणणं आहॆ की हा मानव निर्मित विषाणु आहॆ. त्यामुळे सर्वच देशांना  मोट्या संकटाना तोंड द्यावं लागत आहॆ. चीन मात्र या संकटातुन बाहेर पडत आहॆ. आणी त्यांची अर्थ व्यवस्था ही पुन्हा सुरळीत होत आहॆ . त्यामुळे संपुर्ण जगाची नाराजी चीन वर आहॆ. भारतात ही स्वदेशीचा स्वीकार करावा असे आवाहन केल जात आहॆ तर चिनी मालावर बहिष्कार करावा असं सर्वांचं म्हणणे आहॆ. पण हे किती शक्य आहॆ याचा ही विचार करायला हवा. 1978 साली मागास असलेला देश आज जगात 2 नंबरचा सर्वात प्रगत देश कसा झाला याचा ही थोडासा आढावा घ्यायला हवा, चायना वस्तूंवर आज आपण बॅन आणलं तरी उद्या दुसरा कोणता तरी देश येईल आणी पुन्हा तेच होईल त्यापेक्षा आपण कोठे कमी पडतोय हे पाहणं महत्वाचे. चायनाने एवढ्या लवकर प्रगती कशी केली याचा अभ्यास थोडा करावा, नाहीतर आता चायना आहॆ उद्या दुसरा कोणता तरी देश भारतात येऊन पुन्हा मार्केट काबीज करेल. कोरोनाच संकट चायनाने आणलं की नाही हे नक्की माहीत नाही पण त्यांनी त्या संकटावर खुप लवकर मात केली हे मात्र खरं आहॆ जे अजुनही कोणत्याच देशाला जमलेलं नाही. 


1978 पूर्वी चायना एक मागास देश होता. 1980 साली चायनाने प्रगती करायला सुरवात केली आणी या 2018 पर्यंत एक महासत्ता बनला... हे कशामुळ ? 1990 साली त्यांचं आऊटपुट व्हॅल्यु 3% होती ती 2018 मधे वाढुन 25% एवढी झाली. जगातील कित्तेक वस्तूंच्या प्रोडक्शन मधे चायना 1 किंवा 2 नंबर ला आहॆ. जगातले 80% एअरकंडिश्नर चायना मधे बनतात, 70% मोबाईल चायना मधे बनवले जातात, शूज 60%, कोल 50%, स्टील 50%, जगात  सगळ्यात जास्त अँपलस चायना मधे पिकतात, USA 2 नंबर ला आहॆ तरी त्यांचं उत्पादन अवघे 6% आहॆ. खेळणी बनवण्यात चायनाचा जगात 1नंबर लागतो तर युरोप 2 नंबर ला आहॆ. आपल्या घरातील जवळपास 80% इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये चायनाचे पार्ट बसवलेले असतात ,घडाळ्यातील सेल असो किंवा मोबाईल ची बॅटरी, टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर मधील पार्ट किंवा AC असो सर्वामध्ये चायनाचा एक तरी पार्ट वापरला जातोय. आपला गैरसमज आहॆ की चायना फक्त डुबलीकेट माल बनवतो पण तसे नाही जगातील सर्वात जास्त ब्रँडेड वस्तु चायनाच्याच  आहेत.

चायनाचे भारतातील मार्केट 


भारतीय मार्केट मधे चायनाने खुप मोठा जम बसवला आहॆ. मास प्रोडक्शन आणी कमी किंमत यामुळेच भारतीय मार्केट उठवण्यात चायनाला यश आलं आहॆ. चायनीज मालावर बहिष्कार करणं हा यावर चांगला उपाय आहॆ पण त्याही पेक्षा त्या वस्तुंना पर्याय उपलब्ध करून देणं हे गरजेचं आहॆ. पण असे नियम कदाचीत सरकार बनवु शकणार नाही कारण चायना भारतातुन सर्वात जास्त म्हणजे 20% माल  आयात करतो  तेल ,सोने ई .
  • चायनाचे भारतातील सर्वात मोठे होलसेल मार्केट दिल्ली आणी मुंबई ला आहेत . इथुनच सर्व माल संपुर्ण देशात पसरवला जातो.
  • भारतात दिवाळीत जेवढी दिवाळी साजरी केली जात नाही तेवढी चायना मधे केली जाते, कारण दिवाळीत सर्वात जास्त  म्हणजे 80% दिवाळी लॅम्प, लाईट्स, एलईडी बल्प चायनातून येतात. पण मागच्या 2 वर्षात चायनीज दिव्यावर काही ठिकाणी बहिष्कार टाकला त्यामुळे चायनाच्या मार्केट ला चांगलाच फटका बसला होता. यात हायद्राबाद शहरात सोशिअल मीडिया वर व्हायरल मेसेज ला खूपच प्रतिसाद दिला आणी त्याचा परीणाम हायद्राबाद मधे दिवाळीत चायनीज माल चा स्टॉक केला जात नाही .
  • चायनातून भारतात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या वस्तु म्हणजे दिवाळी दिवे, आकाशकंदील, लहान मुलांची खेळणी, योगा मॅट, मोबाईल & इलेक्ट्रॉनिक वस्तु,  डेटा केबल, एलईडी लॅम्प, लेदर जॅकेट , ब्युटी प्रॉडक्टस  ई . 
  • भारतात चायना चे कपडे आणी सौंदर्य प्रसादाने, फॅशन ऍक्सेसरीज चे मार्केट ही मोठे आहॆ कारण रिबॉक, नाईकी, ऍडीडास अश्या प्रसिद्ध ब्रँड ची प्रतिकृती ही बनते. 
याच बरोबर अनेक ब्रँडेड वस्तु ही भारतात चायना कडुन आयात केल्या जातात अश्या प्रकारे चायनाने संपुर्ण सर्व सामान्यांचे मार्केट काबीज केलं आहॆ त्यामुळे भारतीय लघु उद्योगाला मोठा फटका बसला .

 चायनाची काम करण्याची पद्धत खुपच पद्धतशीर आहॆ .



1) मास प्रोडक्शन : म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूच प्रोडक्शन सुरु करायचं असेल तर ते खुप मोट्या प्रमाणात करायचं आणी बाजारात तो अश्या पद्धतीने फेकायचा की सर्व स्पर्धकच  संपतील. मास प्रोडक्शन मुळे प्रोडक्शन कॉस्ट कमी होते, ट्रान्सपोर्टेशन खर्च, लाईट असा सर्वच खर्च कमी होतो परिणामी वस्तूची किंमत कमी होते .


2) कॉपी पेस्ट सिस्टीम : चायना मार्केट मधे खूपच अपडेटेड असते त्यामुळे जगात कुठलीही नवीन वस्तु लॉन्च झाली की त्याचे काही पीस मागवायचे आणी ते खोलून पहायचे,  तसेच पार्ट मोठ्या प्रमाणात बनवून कॉपी करून तशीच वस्तु बनवायची त्यामुळे त्यांचा R& D चा खर्च वाचतो , इनोव्हेशन चा खर्च वाचतो आणी वेळ ही वाचतो. 


3) प्रोडक्टीव्ह लेबर : चायनाची 3 री मोठी गोष्ट म्हणजे लेबर बऱ्याच जणांचा गैरसमज आहॆ की चायनाचे लेबर स्वस्त आहेत म्हणुन बाकीचे देश तिथे इन्व्हेस्ट करतात पण तस नाही चायनाचे लेबर प्रोडक्टीव्ह आहेत, आपल्या इथे जर एक लेबर 8 तासात 4 मोबाईल बनवत असेल तर चायनाचा लेबर 8 तासात 10 मोबाईल बनवतो एवढा तो स्किल्ड असतो. कारण चायनीज गव्हर्मेंट स्किल डेव्हलपमेंट वर जास्त भर देते.

4) शिक्षणाचा दर्जा : चायना मधे शिक्षणाचा दर्जा चांगला आहॆ, एक्स्पर्टीज वर तिथे भर दिला जातो, लहान वयापासूनच त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज आणी अपडेट टेक्नॉलॉजि ची महिती दिली जाते.   

5) इन्फ्रास्टक्चर आणी इंडस्ट्रिअल हब : हा ही चायनाचा विकासाचा महत्वाचा भाग आहॆ. चायनीज सरकार तेथील उद्योगांना चालना देत असते त्यामुळे तिथे वेगवेगळे हब तयार केले जातात. म्हणजे एखादी कंपनी मोट्या प्रमाणात एखाद्या वस्तूच निर्मिती करत असेल तर खुप कमी किमती मधे लाईट पाणी आणी,bचांगले इन्फ्रास्टक्चर उभे केले जाते तसेच लागणारा कच्चा माल ही त्याच सिटी मधे उपलब्ध होईल याची सोय केली जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रांस्पोर्टेशन खर्च वाचतो, वेळ वाचतो आणी रोजगार निर्मिती ही होते. उदाहरण म्हणजे जर चायनाला AC तयार करायचा आहॆ तर त्यासाठी लागणारा कच्चा माल बनविणाऱ्या कम्पन्या ही त्याच शहरात उभ्या केल्या जातात. बाहेरून आणण्याची गरज पडत नाही रोजगार निर्माण होतो, लेबर ला राहण्यासाठी कन्स्ट्रक्शन उभे केले जातात, त्यामुळे त्यावर आधारित बरेच लघु उद्योग तयार होतात अश्या प्रकारे इंडस्ट्रियल हब तयार होतो .

चायनीज इकॉनॉमी ग्रोथ मधे महिलांची भागीदारी ही मोट्या प्रमाणात आहॆ . पुरुषांच्या मानाने 74% महिलांचा सहभाग कामामध्ये दिसुन येतो. अमेरिके नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात तेथील महिला देशाच्या इकॉनॉमी मधे सहभाग नोंदवतात. 

नुकताच चायनाने हेल्दी महिला धोरण 2030 राबविण्यास सुरवात केली आहॆ. यात महिला व मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नवीन उपाय योजना राबविल्या जाणार आहेत.


चायना हा एक कम्युनिस्ट वादी  देश आहॆ. इथे एक केंद्री सत्ता चालते त्यामुळेच विरोधक नसतात निर्यण घेणे सोपे असते, पुढच्या 25 वर्षांचा विचार करून आराखडा तयार करून निर्णय घेतले जातात, नवीन उद्योजकांना, लघु उद्योजकांना प्रोत्साहन दिलं जाते. सरकार त्यांना सर्वोतपरी मदत करते, तेथील मुलांना परदेशात जाऊन शिकण्यासाठी प्रेरित केलं जाते, महिलांच्या विकासासाठी आणी इकॉनॉमी मधे सहभाग वाढावा म्हणुन योजना राबविल्या जातात. कोणत्याही देशात उद्योग सुरु करण्याअगोदर तेथील परिस्थीचा अभ्यास केला जातो आणी त्याप्रमाणे तिथे उद्योग सुरु केला जातो .

भारतातील परिस्थिती 


या उलट भारताची परिस्थिती आहॆ, भारतात परदेशी उद्योग गुंतवणूक करायला घाबरतात कारण भारतीय व्यवस्थेची अस्तिरता, भारतात एक निर्णय घेण्यासाठी कित्तेक विरोधकांना सामोरे जावे लागते, भारतात प्रत्येक निर्णय 5  वर्षाचा विचार करून केला जातो, रस्ते, ट्रान्सपोटेशन यामुळे कॉस्ट वाढते , कामाची सरकारी पद्धत, स्किल लेबर न मिळणे आणी धरणे, आंदोलन, बंद या गोष्टीमुळे काम करण्यात अडथळा निर्माण होतो यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर भारतात इन्व्हेस्ट करायला घाबरतात, भारतातील शिक्षणाचा दर्जा तेवढा आधुनिक किंवा प्रॅक्टिकल नाही. शिवाय आपली मानसिकता उद्योजकाची नाही आपण जेव्हा काम करतो तेव्हा घर चालवने,घर,गाडी,बांगला आणी सेव्हिंग हाच उद्देश असतो पण चायना किंवा अमेरिका सारख्या देशात देशाच्या इकॉनॉमीत सहभाग महत्वाचा समजला जातो, भारतात उद्योजकते मधे महिलांचा सहभाग खुप कमी आहॆ आणी त्याकडे सरकारच दुर्लक्ष ही आहॆ, भारतातील तरुण वर्ग शिक्षण, उद्योग या कडे लक्ष देण्यापेक्षा जातीयवाद, राजकारण, धर्म याकडे जास्त ओढला जातो. उद्योग व्यवसाय करण्यापेक्षा नोकरी करणे हे तरुणांना सोपे वाटते,  उद्योग वाढीसाठी उपाय योजना राबविण्यात तसेच तरुणांना उद्योग व्यवसाय करण्यास प्रवृत्त करण्यात सरकारला तितकस यश आलेलं नाही . भारतात रोजगार निर्मितीचा वेग कमी आहॆ. 2012 to 2018 मधे भारतात 6.1 दशलक्ष एवढे रोजगार गमावले आहेत. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकी पूर्वी बेरिजगारीत 45 वर्षातील उच्चांकी नोंद केली. स्किल डेव्हलपमेंट ची सुरवात आता होत आहॆ. त्यामुळे त्याला वेळ लागत आहॆ .

भरता समोरील नवीन संधी

भारतात एक संमिश्र अर्थव्यवस्था आहॆ, आणी हेच आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहॆ , जगत सर्वात जास्त प्रगती करणारा देश म्हणुन 2 नंबर ला भारत आहॆ . मुळात भारतीय अर्थव्यवस्था सेवा क्षेत्रावर आधारित आहॆ (जीडीप च्या 60%) 53% लोक आजही शेती करतात .
  • जिडीपी ग्रोथ रेट मधे अर्थीक वर्ष 18-19 च्या पहिल्या तिमाहीत 5% होता  तर चीन चा दुसऱ्या तिमाहीत 6.2 % होता जीडीपी वाढीच्या ग्रोथ मधे भारत आता चीन च्या ही पुढे जात आहॆ .
  • चायना आज प्रगत देश असला तरी चायनाचे प्रशासन हाच सर्वात मोठा धोका चायनाला आहॆ, तेथील लोकांना विरोध करण्याचा अधिकार नाही, त्यांच्याकडे पूर्ण स्वातंत्र नाही, चायना सध्या प्रदूषणाच्या मोठ्या समस्या ला सामोरे जात आहॆ, कम्युनिस्ट पक्षाच्या हातात संपुर्ण देश असल्याने न्याय व्यवस्था निपक्षपाती नाही. तसेच चायनाची वृत्ती संपुर्ण जगावर राज्य करण्याची आहॆ त्यामुळे विरोधक ही वाढले आहेत, चायनाने खुप लवकर प्रगती केली तरीही मागच्या काही वर्षात ग्रोथ रेट कमी झाला आहॆ. एका ठराविक काळानंतर चायनाचा विकास दर स्थिर राहील म्हणजेच वेग कमी होईल आणी कोरोनामुळे जर काही देशांनी चायना मधील इन्व्हेस्टमेंट काढुन घेण्याचा निर्णय घेतला तर याचा परीणाम चायनावर खुप मोठा होऊ शकतो.
  • चायना नंतर इन्व्हेस्टमेंट साठी भरत देश सर्वाना अनुकूल समजला जात आहॆ. त्यामुळे 300 हुन अधीक कंपन्यांनी बोलणी सुरु केली आहॆ. त्यामुळेच भारतात आता नवीन संधी तयार होत आहेत .
  • कोरोनामुळे आता देशासमोर नवीन संधी निर्माण झाली आहॆ . विदेशी मालाचा वापर न करता स्वदेशीचा स्वीकार केलातर अनेक नवीन उद्यो तयार होतील , पण त्यातही जर आपण विचार केला तर ब्रँडेड वस्तु किंवा मोट्या कंपन्यांच्या वस्तु विकत घेण्यापेक्षा छोटे व्यापारी, लघु उद्योग, महिला उद्योग यांचा वस्तु खरेदीला प्राधान्य दिले तर, संपत्तीचे केंद्रीकरण कमी होईल, परिणामी दारिद्र्य रेषेखालचा, मध्यम वर्गीयानाचा दर्जा सुधारेल. शेती हा आपल्या देशाचा कणा आहॆ त्यामुळे शेती तसेच शेत मालावर प्रक्रिया  उद्योग यावर भर दिला तर  निर्यातीचे प्रमाण ही वाढेल . 
कोरोना व्हायरस मुळे देशा समोर खुप मोठे संकट उभे राहिले आहॆ, कोट्यवधी कामगार आणी त्यांच्या कुटुंबाच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहॆ. यामध्ये बांधकाम मजुर, वाहतुक कामगार, घरकाम करणारे, पथ विक्रेते , छोटे दुकानदार , कचरा गोळा करणारे, हॉटेल मधे काम करणारे, रस्त्यावरील छोटे विक्रेते, छोट्या कम्पन्यातील कामगार, हमाल अश्या लेबर लोकांचा समावेश आहॆ आणी हा आपल्या देशाच्या इकॉनॉमी चा सर्वात मोठा भाग आहॆ. या संकटावर मात करण्यासाठी या वर्गाचा विचार करून नवीन आर्थिक धोरणे राबविणे गरजेचे आहॆ, 30 वर्षात जर चीन पुढे जाऊ शकतो तर पुढच्या 25 वर्षाचा विचार आपण केला तर भारत देश ही जगातील सर्वात मोठी महासत्ता होऊ शकतो ....

That some achieve great success, is proof to all that others can achieve it as well.

Thanks & T.c , be safe .

Mrs. Megha Hanmant Pawar 🙏



2 comments:

  1. Deepshri Food Dehurod
    Khup cha Mast Mahiti Milali
    Thanks Megha Tari

    ReplyDelete

बचतगट (SHG ) संकल्पना, व्याप्ती आणि आणि इतिहास. (महिला सक्षमीकरण )

  स्वयंसहायता गट म्हणजेच बचत गट त्यालाच (धग ) म्हणले जाते. १० ते २० महिला एकत्र येऊन एक गट स्थापन करतात आणि त्या मार्फत एकमेकांच्या गरज भागव...