Thursday 28 May 2020

MSME (Micro,Small& Medium Enterprises)

Msme(Micro,Small& Medium Enterprises)

Covid 19 चा परीणाम देशातल्याच नव्हे तर जगातल्या उद्योग व्यवसाय वर झालेला दिसतो येणाऱ्या भविष्यात उद्योग व्यवसाय टिकवणे आणी वाढविणे हे महत्वाचं आहॆ, त्या दृष्टीने नवीन योजना प्रत्येक देश राबवित आहॆ त्याच प्रमाणे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारतामधेही तशी पावले उचलली जात आहेत. MSME साठी सरकाने काही नवीन योजनांची घोषणा केली आहॆ, आता MSME म्हणजे काय तर (Micro,Small & Medium Enterprises) सूक्ष,लघु आणी मध्यम उद्योग. 


MSME ची स्थापना : 
आक्टोबर 1999 साली लघु उद्योग व कृषी व ग्रामीणउद्योग मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. सप्टेंबर 2001मधे याचे विभाजन लघु उद्योग मंत्रालय आणी कृषी व ग्रामिण उद्योग मंत्रालय असे झाले. 9 मे 2007 साली या दोन्ही मंत्रालयाचे विलीनीकरण करून MSME ची स्थापना झाली म्हणजेच सूक्ष्म, लघु आणी मध्यम उद्योग मंत्रालय. लघु उद्योगांना चालना आणी प्रोत्साहन देण्याचे काम या मंत्रालयाकडे सोपविण्यात आले. तंत्रज्ञान सुधारणे, बाजारपेठेचा विस्तार करणे, उत्पादन क्षमता वाढविणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे यासाठी या मंत्रालयामार्फत उपाययोजना राबविल्या जातात.भारताच्या अर्थव्यवस्थेत MSME ची खुप महत्वाची भूमिका आहॆ. भारतात जवळपास 12.5 million MSME आहेत, तर 30 million एम्प्लॉई इथे काम करतात, भारताच्या एकूण इंडस्ट्रिअल प्रोडक्शन मधे 50% प्रोडक्शन MSME मार्फत केले जाते, तर एक्स्पोर्ट मधे 45% योदान आहॆ .म्हणुनच देशाचा आर्थिक विकास होण्यासाठी MSME चा विकास होणे गरजेचे आहॆ.

MSME म्हणजे काय .
कोणताही उद्योग सुरु करायचा म्हणलं की उद्योगाच्या कॅटेगरी नुसार वेगवेगळ्या रजिस्ट्रेशन ची ( license)ची गरज असते यात सर्वात महत्वाचं म्हणजे MSME रजिस्ट्रेशन. MSME म्हणजेच उद्योग आधार आह हे बऱ्याच जणांना अजुन माहीत नाही. अगोदर शॉप ऍक्ट हे लायसन समजलं जायचं, त्यानंतर SSI काढावे लागायचे तर MSME मधे नोंद होत होती. आता बदललेल्या परिभाषे प्रमाणे उद्योग आधार हे कोणताही उद्योग सुरु करण्यासाठीचे एक लायसन आहॆ आणी MSME रजिस्ट्रेशन हि. आपल्या उद्योगाचे आपण MSME रजिस्ट्रेशन केले असेल तर आपल्याला MSME मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेता येतो. MSME/ SSI / Udyog aadhar हे एकाच आहेत.

MSME चे फायदे :
1) व्यवसायिक बँक कर्ज घेणे सोपे होते .
2) विजबिलामध्ये सवलत .
3) भारत सरकार अंतर्गत मान्यता प्राप्त 
4) सरकारी प्रोत्साहन योजना ,अनुदान यांचा लाभ घेता येतो.
5) कर कायद्या अंतर्गत सुट.
6) ट्रेडमार्क नोंदणीवर फी च्या 59% सुट मिळते .
7) बँकेत चालु खाते सहज उघडता येते .
8) मजुरी परवाने ,नोंदणी मिळवणे सोपे .
9) बँकेतील ओव्हरड्रॅफ्ट च्या दरामध्ये 1% ची सुट मिळत.

MSME कश्या पद्धतीने काम करते .
MSME मधे रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या उद्योगाला कसा फायदा होतो यासाठी MSME नीट समजुन घ्यायला हवे. MSME मधे रजिस्ट्रेशन करण्यासाठी क्रायटेरिया तयार केला आहॆ. आपण कोणत्या क्रायटेरियात बसतो त्याप्रमाणे आपल्याला योजनेचा लाभ घेता येतो. MSME ने उद्योगांचे 2 भागांमध्ये विभाजन केलं आहॆ. 
1) मॅनुफॅक्चरिंग इंडस्ट्री 
2) सर्व्हिस इंडस्ट्री 
लघु ,सूक्ष्म आणी मध्यम उद्योग कोणते हे ओळखता येण्यासाठी एक क्रायटेरिया दिला आहॆ, रजिस्ट्रेशन करताना या क्रायटेरियाचा विचार करूनच नोंदणी केली जाते.


या प्रकारे क्रायटेरिया इन्व्हेस्टमेंट नुसार तयार करण्यात आला होता. पण आता यात बदल करण्यात आला आहॆ. काही दुवसांपूर्वी फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी 12 मे ला नवीन क्रायटेरिया जाहीर केला आहॆ तो रिव्हाईज करून पुढील प्रमाणे आहॆ.

या तक्त्यात दिल्या प्रमाणे आणी आपण मॅनुफॅक्चरिंग मधे येतो की सर्व्हिस क्षेत्रात तसेच इन्व्हेस्टमेंट आणी टर्नओव्हर च्या कोणत्या कॅटेगरीत आपण बसतो याचा विचार करून रजिस्ट्रेशन करायचे असते .

MSME रजिस्ट्रेशन प्रोसेस: 
MSME मधे आपल्या उद्योगाचे रजिस्ट्रेशन करणे अगदी सोपे आहॆ आणी ऑनलाईन आहॆ याला कोणतीही फी द्यावी लागत नाही. आपण स्वता घरीच हि नाव नोंदणी करू शकतो. यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. एसएमई नावनोंदणी साठी मालकाला एक फॉर्म भरणे आवश्यक आहे, तो ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरू शकतात. ऑनलाईन नोंदणीसाठी अर्जदाराने अधिकृत साईट वर जाऊन फॉर्म भरावा लागतो .
या फॉर्म मध्ये व्यवसाय, बँक खाते, मालकी आणि रोजगार तपशील आणि इतर  तपशील द्यावा लागतो व्यक्तीस त्याचे स्वत: चे प्रमाणित प्रमाणपत्रे नमुद करावी लागतात,या प्रक्रियेसाठी कोणतीही नोंदणी फी भरणे आवश्यक नाही. तपशील भरल्यानंतर आणि ती अपलोड केल्यानंतर नोंदणी क्रमांक तयार केला जातो आणि तो  दिलेल्या ईमेल वर पाठविला जातो.
आवश्यक गोष्टी 
1) आधार कार्ड 
2) पॅन कार्ड 
3) कंपनी चे नाव आणी संपुर्ण पत्ता 
4)बँक डिटेल. 
5) नंबर of एम्प्लॉयी 
या दिलेल्या लिंक वर जाऊन आपले उद्योग आधार / MSME रजिस्ट्रेशन आपण करू शकता .


MSME च्या योजना 
सूक्ष्म, लघु आणी माध्यम उद्योग मंत्रालयामार्फत आत्ता पर्यंत बऱ्याच योजना राबविल्या आहेत. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, खादी तसेच जिल्हा उद्योग केंद्रातून राबविल्या जाणाऱ्या योजना, लोन सबसिडी च्या योजना, वूमन एम्पावरमेंट योजना, स्किल डेव्हलपमेंट च्या योजना, मुद्रा लोन, स्टार्टअप लोन अश्या बऱ्याच योजना राबविल्या जातात. खाली दिलेल्या लिंक जाऊन तुम्ही सर्व योजना पाहु शकता.

काही दिवसांपूर्वीच मा.निर्मला सीतारामन यांनी covid 19 पार्श्वभूमीवर काही नवीन योजना MSME मधे आणल्या आहेत. यातील 5 महत्वाच्या योजना पुढील प्रमाणे .

1) तारणमुक्त कर्ज : 100 कोटी टर्नओव्हर असणारे उद्योग 25 कोटी पर्यंत लोन घेऊ शकतात पहिल्या वर्षी कोणतीही मुद्दल परत फेड करावी लागणार नाही, व्याज हि कमी असेल हि परतफेड 4 वर्षाची असेल या लोन साठी सरकार स्वता ग्यारंटर असणार आहॆ त्यामुळे कोणतेही तारण देण्याची गरज नाही. याची मुदत 31ऑकटोम्बर 2020 आहॆ.

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत ..

2) 200 कोटी पर्यंत च्या टेंडर मधे तरतुद : आता 200 कोटी पर्यंतचे टेंडर हे ग्लोबल टेंडर असणार नाहीत म्हणजे आता हे टेंडर भारतीय उद्योगच भरू शकतील बाहेरच्या कंपन्यांना असे टेंडर भरता येणार नाहीत त्यामुळे स्वदेशीचा चालना मिळेल.
3) EPF सपोर्ट : यामध्ये ज्या उद्योगांमध्ये 100 कर्मचारी आहेत व त्यांचा रोजगार 15000 पर्यंत आहॆ त्यांचा 3 महिन्याचा ( मार्च ते मे )EPF सरकार भरणार आहॆ तो कालावधी वाढवुन आता ऑगस्ट पर्यंत केला आहॆ.  
4) बांधकाम उद्योग ला मदत : यामध्ये नवीन प्रोजेक्ट नोंदणी आणी चालु प्रोजेक्टच्या पूर्णत्वाची तारीख यामध्ये 6 महिन्यांची मुदतवाढ दिली आहॆ. 
5) टॅक्सेस मुदत वाढ : IT रिटर्न भरण्याची तारीख जी 31 जुलै पर्यंत होती ती आता वाढुन 30 नोव्हेंबर केली आहॆ. तसेच TDS हि 25% कमी करणार असल्याचे सांगितले आहॆ .
हे फक्त महत्वाचे मुद्दे होते याची संपुर्ण माहिती वर दिलेल्या लिंक वर दिलेली आहॆ.

MSME ची महिती आणी योजना जास्त आहेत त्या सर्व एका ब्लॉग मधे मांडणे थोडे कठीण आहॆ त्यामुळे फक्त महत्वाचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला आहॆ. MSME च्या साईट वर जाऊन संपुर्ण महिती घेऊ शकता ...


 
Thanking You.
Mrs. Megha Pawar.

Join us 
Buying & selling E-Commerce platform .



  

2 comments:

  1. Thanku so much megha mam... माहिती खूप छान दिलीय ज्यांना नवीन bussiness ची सुरुवात कशी करायची ते अत्यन्त सोप्या भाषेत सांगितले तुम्ही....मला msme म्हणजे काय ते आज कळलं.... thanku सो much....

    ReplyDelete

बचतगट (SHG ) संकल्पना, व्याप्ती आणि आणि इतिहास. (महिला सक्षमीकरण )

  स्वयंसहायता गट म्हणजेच बचत गट त्यालाच (धग ) म्हणले जाते. १० ते २० महिला एकत्र येऊन एक गट स्थापन करतात आणि त्या मार्फत एकमेकांच्या गरज भागव...